पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी!
पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. पेन्शनधारकांना आता सरकारने ५० टक्के जास्त पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शनमध्ये वाढ केल्याने आता तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत. पण, याचा फायदा काही पेन्शनधारकांनाच होणार आहे. देशात एकाबाजूला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे, तर आता सरकारने पेन्शनमध्ये ५० टक्क्यांनी वाढ केली आहे.
वर्ष २००६ मध्ये निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून हा लाभ मिळणार आहे. निवृत्ती वेतनात सुधारणा करण्यात आली असून, त्यामध्ये अतिरिक्त निवृत्तीवेतनासाठी निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे की 80 ते 85 वर्षांखालील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना 20 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळेल. यासोबतच, 85 ते 90 वयोगटातील पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 30 टक्के अधिक म्हणजे या लोकांना 30 टक्के अतिरिक्त पेन्शन मिळेल.
यासोबतच 90 वर्षे ते 95 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना सुधारित मूळ पेन्शन किंवा कौटुंबिक पेन्शनच्या 40 टक्के अधिक रक्कम मिळेल. 95 ते 100 वर्षांखालील पेन्शनधारकांना 50 टक्के अधिक पेन्शन रक्कम मिळेल. याशिवाय 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी 100 टक्के अतिरिक्त पेन्शन रक्कम असणार आहे.
या पेन्शचा फायदा राज्यातील पेन्शनधारकांना होणार आहे, अतिरिक्त पेन्शन किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनाची रक्कम स्वीकारण्याची प्रक्रिया पेन्शन अधिकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रादेशिक कार्यालयाद्वारे सुनिश्चित केली जाईल. याशिवाय पेन्शन किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनाच्या रकमेचा पेमेंट ऑर्डरही अधिकारीच देईल अस सांगण्यात आले आहे. जुन्या पेन्शन योजनेत सर्वात मोठा फायदा शेवटच्या पगाराच्या आधारावर आहे. याशिवाय महागाईचा दर वाढला की डीएही वाढतो. सरकार जेव्हा नवीन वेतन आयोग लागू करते तेव्हाही पेन्शन वाढवते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.