Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मी कधीही राजकारणातून निवृत्त होणार नाही; सोनिया गांधी..

मी कधीही राजकारणातून निवृत्त होणार नाही; सोनिया गांधी..


छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. पक्षाध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना त्यांनी हे संकेत दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता राजकारणातील निवृत्तीबाबत सोनिया गांधी यांनी मोठं विधान केलं आहे.

सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मी कधीच निवृत्त झाली नव्हती आणि कधीच होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या मुद्द्यावर सोनिया गांधींशी चर्चा झाल्याचं अलका लांबा यांनी म्हटलं आहे. अलका यांनी मी मॅडमना निवृत्तीशी संबंधित बातम्या मीडियामध्ये आल्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या की, मी कधीच निवृत्त झाली नाही आणि भविष्यातही होणार नाही, असे म्हटले आहे.

1998 साली मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. 25 वर्षात पक्षाने अनेक मोठे यश संपादन केले आहे आणि निराशाही आली आहे. 2004 आणि 2009 मध्ये आमच्या विजयाबरोबरच मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले, पण मला याचा सर्वाधिक आनंद आहे. अध्यक्ष म्हणून कार्यकाळात 'भारत जोडो यात्रे'ने संपुष्टात आली. यामुळे काँग्रेस आणि जनता यांच्यातील संवादाचा वारसा समृद्ध झाल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

'भारत जोडो यात्रे'साठी त्यांनी राहुल गांधींचे आभार मानले. काँग्रेस हा फक्त राजकीय पक्ष नसून देशाच्या एकात्मतेची धुरा आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. आम्ही देशाच्या प्रश्नांसाठी लढतो. आता आपण जनतेचा आवाज बनण्याची वेळ आली आहे. धर्म, जात, भाषेची पर्वा न करता आपल्या सर्वांचा आवाज बना. त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल. राहुल यांच्या समर्पण आणि निष्ठेमुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्याच्या यशाचे श्रेयही यात्रेत सहभागी असलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना जाते.सोनिया गांधी यांनीही आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. 'दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे. संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचला आहे. पुढे आणखी कठीण काळ आहेत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.