सायकल प्रेमी मित्रासाठी थोडं सायकल बद्दल.
जेव्हा आपण सायकल विकत घेतो त्यावेळेस आपण प्रथम तिची किंमत किती हे बघतो. सायकलची किंमत ही तिच्या वजनावर व तिला कुठल्या प्रकारचे components (spare part) बसवले आहेत यावर अवलंबून असते. सायकलच्या फायरफॉक्स, जावा, बिटवीन (decathlon)स्कॉट ,ट्रॅक अशा खूप कंपन्या बाजारात आहेत. मित्र मंडळी चर्चा करताना कोणी म्हणत ट्रॅक घ्या, कोणी म्हणतो scot घ्या.पण नेमकी कुठली घ्यावी हे काही कळत नाही. सुरुवातीला आपण फ्रेम विचार करू.
सायकलची फ्रेम ही
1)steel
2)Alloy
3)carbon fiber
4)Titanium या धातू मध्ये येते.
स्टील ची फ्रेम वजनाला जड असते,म्हणून सर्व जुन्या सायकली अटलॉस, Hercules या सर्व स्टील मध्ये होत्या. आपण वापरात असेलेल्या सर्व सायकली या Alloy /carbon मध्ये असतात. कार्बन फ्रेम सायकल वजनाला हलकी व मजबूत असतात, पण महाग असतात. Titanium फ्रेम ही कार्बन पेक्षा थोडी कमी प्रतीची आहे,पण खूप छान आहे,carbonla पर्याय. कार्बन म्हणजे कोळसा. कोळश्याला विशिष्ट तापमानाला chemical टाकून टणक बनवतात. आपली सर्व satelight कार्बन पासून बनवलेली असतात.
Alloy फ्रेम घेतांना fork (पुढेच चाक ज्यात अडकवले असते)जर कार्बन घेतले तर जास्त चांगले.कार्बन फ्रेम घेण्याची ची गरज नाही. काही फ्रेम या कुठेही जोड न देता बनवलेल्या असतात, एकाच साच्यात.अशा फ्रेम महाग असतात.काही जोडून बनवलेल्या असतात. सायकल बनवणाऱ्या सर्व कंपन्या फक्त Frem व fork बवतात.इतर सर्व पार्टस बाहेरून आणून बसवतात.
म्हणून सायकल घेतांना components बघणे जास्त महत्वाचे आहे. COMPONENTS--components बनवणाऱ्या Shimano(जपान),Sram(अमेरिका) व इतर कंपन्या आहेत.【Sram--is an acronym of scott+Ray+Sam】
या दोन्ही कंपन्या सर्वात चांगले components बनवतात. बाजारात Shimano मध्ये जवळपास 9 प्रकारचे Components उपलब्ध आहेत.
1)Claris
2)Tourney
3)sora
4)Tiagra
5)105
6)Ultegra
7)Dura Ace
8)Ultegra Di2 elecronics
9) Dura Di2 electronics
यात 1 ते 3 हे सर्व एन्ट्री लेवल components आहेत. कमी किंमतीची. Tiagra ते Ultegra हे सर्व higher end compo. आहेत. सायकलची वायरिंग आतून असल्यास किंमत वाढते. 【Interanal cable routing】 Sram चे देखील असे 13प्रकार आहेत. यातील सर्वात महाग Sram Force Axs,Sram Red Axs ही आहेत. ही व Ultegra components सेट 1.25 लाखच्या पुढे जातात,यात tube/tyre नाही.
BREAK---तीन प्रकारचे ब्रेक उप लब्ध आहेत
¡)rim break
¡¡)mechanical disc break ¡¡¡)Hydrolic break
यात hydrolic ब्रेक सर्वात महाग असतात. Mechqnical डिस्क ब्रेक सर्वात छान व मेंटनस फ्री. रिम ब्रेक आपले छोटी गादी वाले ब्रेक. HANDLE BAR--जवळपास 8 ते 10 प्रकारचे सायकल हँडल उपलब्ध आहेत.आपणास 3 प्रकाचे बार उपयोगी आहेत
1)फ्लॅट हँडल बार
2)ड्रॉप बार
3)येरो बार(Aero)
Flat handle bar हे आपल्या नेहमीचे सरळ हँडल. हे सर्वांसाठी, सर्व वयोगटासाठी उपयोगी Drop बार हे आपणास जास्त aerodynamic shape देते, खाली वाकल्यामुळे हवेशी घर्षण कमी होते व वेग वाढतो.
Aero bar--- हा बार flat बारवर आडवा बसवलेला असतो. यामुळे आपले दोन्ही हात जवळ येतात व aerodynamic shape तयार होऊन वेग वाढतो. TYPES OF CYCLE --यात Tendem bike,Mud bike, MTB, Hybrid व Road bike असे प्रकार आहेत.यात आणखी उपप्रकार आहेत. Tendem bike --यात सायकलला दोन सीट असतात. Mud bike ही वाळूवर किंवा चिखलात वापरतात.
MTB (Mountain Terrain Bike)ही सर्वसामान्य सायकल असून ही आपण hilly terrain,off road,खराब रस्त्यावर वापरू शकतो. Hybrid ही देखील सर्वसामान्य चांगल्या रस्तावर वापरणारी सायकल आहे. ही रोड बाईक व MTB चे कॉम्बिनाशन आहे.
Road bike ही रेसिग सायकल असून, हिला shocks-up नसतात. MTB सायकला shock up जरूर घावे.इतर सायकलीला त्याची गरज नाही. Shock up आसवे की नसावे.रायडर जर नवीन असेल,वय 45 च्या पुढे असेल,धक्के सहन होत नसतील तर shock up जरूर घावे.
पण shock up आपली kinetic Energy absorb करून वेग कमी करतात.तसेच सायकलचे वजन 1ते 1.5 kg ने वाढवतात व सायकलची किंमत देखील वाढवतात. आपण चालवत असलेला रस्ता जर चांगला असेल तर कोणत्याच सायकलला शॉक up ची गरज नाही. या वरील सर्व सायकलिंचे टायर किती जाड आहे यावर सायकलचे नाव अवलंबून आहे.
सायकल टायरचे स्पोक देखील आता aerodynamic/ blade स्पोक येत आहेत.याची किंमत थोडी जास्त आहे, पण या स्पोकमुळे हवेशी घर्षण कमी होत असल्याने वेग वाढतो.साधे स्पोक हे एक सरळ तार असते, हे स्पोक आपल्या भाषेत चिप्पट असतात. रेसिग सायकल चे टायर 700mm×25mm(700×25c) outer diameter व width अशी असतात. यात काही 650× 18c देखील आहेत.पण शक्यतो ही कोणी वापरत नाहीत ,कंपनी बनवत नाहीत.
Mud bike ची width 50mm असते. जेवढे टायर जाड तेवढा तुमचा जमिनीशी संपर्क (grip)जास्त,पडण्याचे चान्सेस कमी,पण वेग देखील कमी.टायर कमी जाड असल्यास पडण्याचे चान्सेस जास्त पण वेग देखील जास्त. Schwalbe व Continental(दोन्ही जर्मनी) ही टायर अतिशय चांगली आहेत.Grip खूप छान आहे,पण महाग आहेत, या मुळे सायकल ची किंमत वाढते.
CASSETTE & CRANKSET--हे दोन्ही मिळून सायकलचे गियर सेट बनतो. Cassette हा पार्ट सायकच्या मागच्या चाकावर असतो. हा रेसिग सायकल मध्ये 11×14×16×18×22×24×26×28×32(drivetrains)(9 division)असतो. या teeth set ला sprockets म्हणतात.हे सर्व एकत्र केल्यास त्याला Cogset/Clustar म्हणतात. (Lower number of teeth- maximum torque)
Crankset -- याला 2 किंवा 3 रिंग असतात. याला 50/34/20 teeth असतात. जेवढे जास्त teeth तेवढी ताकत जास्त लागते.
आपल्याकडे crankset ला 50वर teeth नसतात. मी पॅरिसला 54 बघितले.
यांमुळे गियर सेट 9×2,9×3,11×2 असा बनतो.
Road bike ला सर्वात चांगला groupset 9×1
MTB ला 14×3 ग्रुप सेट चांगला.
मी आताच पॅरिस ला रेसिग सायकलला हा प्रकार फक्त 9×1,11×1 बघितला.या मुळे सायकलचे वजन व किंमत कमी होते. कारण front derailor नसल्यामुळे. फ्रंट डेरेलर नसणे हे रेसिंग सायकल साठी खूप चांगली गोष्ट आहे.अजून भारतात हा प्रकार उपलब्ध नाही.आल्यास हीच सायकल घेणे. माझ्याकडे रोड बाईक आहे,मी कधीच फ्रंट डेरेलर चा वापर करत नाही.
रेंसिंग सायकल सोडून इतरांनी हा सायकल प्रकार घेऊ नये. सायकल ची चैन हा देखील अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. हिचे वजन 250 gram पासून 1kg पर्यंत असते. चैन ही link(roller /pin) या दोन प्रकारात येते. लिंक म्हणजे चैनचा छोटा तुकडा.या लिंक एकत्र केल्यास त्याला neckless देखील म्हणतात. या किती link आहेत यावर सायकलचे वजन किंमत अवलंबून आहे. सायकल घेतांना कंपनी without pedal व without स्टँड च सायकलचे वजन shop owener ला कळवतात.ते पेडल वजनात धरत नाहीत. पण दुकांदारास हे माहीत नसते
DERAILOR-हा देखील महत्वाचा पार्ट असून फ्रंट व रिअर असे दोन भाग असतात.या मुळे आपण गियर change करू शकतो. हा देखील सायकल विकत घेतांना कोणता बसवला आहे हे बघावे. शिमाणो ग्रुपसेट एकत्र असेल तर चांगले. आता पुढे भविष्यात रोड बाईकला फ्रंट डीरेलर येणार नाही. उंचीनुसार सायकल घ्यावी.पण उंची मोजतांना आपली उंची कमरेपासून पाय किती लांब आहेत या नुसार सायकल घ्यावी.
सायकलचा स्पीड हा फक्त सायकल वजनाला हलकी आहे व रायडर हलका आहे,यावर अवलंबून नाही. उतारावर aerodynamic shape मुळे जाड माणूस पुढे निघून जातो. सायकलचा स्पीड तुम्ही योग्य दाबाची हवा भरली आहे का नाही यावर देखील अवलंबून असतो. बऱ्याच लोकांना वाटते गियर वाली सायकल आहे म्हणून स्पीड जास्त.परंतु गियर व स्पीडचा काही संबंध नाही. वजन कमी करण्यासाठी रनिंग पेक्षा cycling हा चांगला उपाय आहे.जाड माणसाने रनिंग केल्यास घुडघे खराब होऊ शकतात.सायकल मूळे घुडघे खराब होत नाहीत.
मातोश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स,तिबेटीयन मार्केट जवळ,नाशिक चे मालक श्री. सूर्यवंशी 85 व्या वर्षी देखील सायकल चालवतात. सायकल मुळे या वयात त्यांचे काय ती बॉडी, काय ते दात, सर्व अवयव एकदम ok आहे. युरोपियन देशामध्ये प्रवासासाठी व इतर कामासाठी ,व्यायामासाठी सायकल हा त्या लोकांनी निवडलेला उत्तम पर्याय आहे.भारतात हा प्रकार हळू हळू रुजत आहे,पण सध्या तो फक्त हौस म्हणून किंवा व्यायामापुरता मर्यादित आहे. नेदरलँडला मी रस्त्यावर तीन मजली सायकल पार्कींग बघितल्या. तिथे एका व्यक्ती कडे कमीतकमी दोन सायकली आहेत.ते विना हेल्मेट सायकल वापरतात.कारण तेथील सायकल संस्कृती व नियम.
Kishor chaudhari, Nashik.
Amateur Runner & cyclist
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.