Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विमानाने जायचे होते बिहारला पण पोहोचला राजस्थानला

विमानाने जायचे होते बिहारला पण पोहोचला राजस्थानला


नवी दिल्ली: विमानतळावरून एका प्रवाशाला बिहारमधील पाटण्याला जायचे होते. त्यासाठी त्याने इंडिगोच्या विमानाने प्रवास करण्याचे ठरवले. मात्र प्रवाशाला विमान कंपनीच्या दुसऱ्याच फ्लाइटमध्ये बसवण्यात आले. त्या व्यक्तीला दिल्लीहून पाटणा गाठायचे होते. पण पाटण्याऐवजी हा व्यक्ती 1400 किमी अंतरावर असलेल्या उदयपूर, राजस्थानमध्ये उतरले. ही घटना 30 जानेवारी रोजी घडली.

दरम्यान, विमान कंपनीच्या ही चूक लक्षात आल्यानंतर, दुसऱ्या दिवशी प्रवाशाला त्याच्या इच्छित स्थळी पाठवण्यात आले. याबाबत प्रवाशाने एअरलाइन्स इंडिगोचे अधिकारी आणि नागरी विमान वाहतूक विभागाकडे तक्रार केली होती. प्रवाशाच्या तक्रारीवरून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसर हुसैन असे या प्रवाशाचे नाव आहे. अफसर हुसैन यांनी पाटण्याला जाण्यासाठी इंडिगो फ्लाइट 6E-214 चे तिकीट बुक केले होते. 30 जानेवारी 2023 रोजी हुसैन त्याच्या विमानाच्या नियोजित वेळेवर दिल्ली विमानतळावर पोहोचले.

पण चुकून त्याला उदयपूरला जाणार्‍या भारताच्या फ्लाइट 6E-319 मध्ये बसवण्यात आले. उदयपूरला उतरल्यावरच प्रवाशाला देखील ही चूक लक्षात आली. हुसैन यांनी उदयपूर विमानतळावरील अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीनंतर विमान कंपनीने त्याच दिवशी प्रवाशाला परत दिल्लीला आणले. दिल्लीत एक दिवसाच्या मुक्कामानंतर 31 जानेवारीला अधिकारी हुसैन यांना विमानाने पाटण्याला पाठवण्यात आले.

'आम्ही या प्रकरणी अहवाल मागवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर विमान कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल.' असे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 'तपासणीत डीजीसीए प्रवाशाचा बोर्डिंग पास योग्यरित्या का स्कॅन केला गेला नाही. बोर्डिंग करण्यापूर्वी बोर्डिंग पास नियमानुसार दोन ठिकाणी तपासला जातो, मग तो चुकीच्या फ्लाइटमध्ये कसा चढला.' असे सवाल अधिकाऱ्यानी उपस्थित केले आहेत. 6E-319 दिल्ली-उदयपूर फ्लाइटमधील एका प्रवाशाच्या घटनेची चौकशीनंतर कारवाई केली जाईल. असे एअरलाइनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.