Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला..

छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला..


अमेरिकेच्या उत्तर भागात कॅलिफोर्नियाच्या सॅन होजे शहरातून चोरी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शोध लागला आहे. गेल्या महिन्यात या पुतळ्याची चोरी झाली होती. हा पुतळा अमेरिकेतील एका कुप्रसिद्ध भंगार दुकानात हा पुतळा सापडला आहे. संतापजनक बाब म्हणजे या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

शिवरायांच्या या पुतळ्याचं वजन सुमारे 200 किलो इतकं आहे. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन होजे शहराला 1999 सालात पुणे शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता. तो येथील ग्वाडालूप रिव्हर पार्कमध्ये बसवण्यात आला होता. 31 जानेवारी रोजी या पुतळ्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अखेर हा पुतळा अमेरिकेतल्या एका भंगाराच्या दुकानात सापडला.

हे दुकान बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुप्रसिद्ध आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांनी तीन जण हा पुतळा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला होती. हे तिघं जण 29 जानेवारी रोजी हा पुतळा घेऊन या दुकानात आले होते. 9 फेब्रुवारी रोजी हा पुतळा या दुकानात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली आणि पुतळा हस्तगत केला.

अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे. संतापाची बाब म्हणजे या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. सॅन होजे-पुणे सिस्टर सिटी संघटनेचे अध्यक्ष सुनील केळकर यांनी या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सॅन होजे शहराचे महापौर मॅट महान यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. हिंदुस्थानींसाठी हा पुतळा एखाद्या देवतेच्या मूर्तीप्रमाणे पवित्र आणि अमूल्य आहे, असं महान म्हणाले आहेत. हा पुतळा चोरी होण्याची ही दुसरी वेळ आहे. 

हा पुतळा भेटस्वरूप मिळाल्यानंतर तीन वर्षांनी शहरातील एका महत्त्वाच्या ठिकाणी बसवला गेला होता. पण, त्यापूर्वी तो ज्या घरात ठेवला होता, तिथून त्याची चोरी केली गेली होती. सुदैवाने शहरातील एका रस्त्यावर तो जॉगिंग करणाऱ्या नागरिकाला आढळला होता. 2002 साली हा पुतळा ग्वाडालूप रिव्हर पार्क येथे बसवण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.