Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका..

मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका..


मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार? या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, अजूनही काहीच निर्णय नसल्याने निवडणूक अद्याप का घेतली नाही? असा सवाल मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला विचारला आहे.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 24 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप का घेतल्या नाहीत? अशी विचारणा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

टी व्ही ९ ने दिलेल्या माहितीनुसार, दर पाच वर्षांनी निवडणुका घ्याव्यात. या घटनेनं घातलेल्या नियमाचं राज्य निवडणूक आयोगानं उल्लंघन केलं आहे. तसेच आयोगाची ही कृती देशद्रोही असल्यानं याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंबईतील रहिवासी रोहन पवारनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर 27 फेब्रुवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाचे अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाहीत, निवडणुका प्रक्रिया राबवण्याचा आयोगाचा अधिकार अबाधित आहे. तरीही निवडणूक आयोगाकडून निवडणुका का घेतल्या जात नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्याच्यावतीनं त्यांचे वकील अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.