Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्यजीत तांबेंबाबत अजित पवार यांचे महत्वाचं वक्तव्य

सत्यजीत तांबेंबाबत अजित पवार यांचे महत्वाचं वक्तव्य


विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामतीमध्ये एका जाहीर सभेत बोलताना सत्यजीत तांबेंबाबत महत्वाचे विधान केले आहे. 'आमची चूक झाली, सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती,' असे पवार म्हणाले आहेत. 'आमची जरा चूक झाली. मी त्याचा अगोदरच उल्लेख केला आहे. नाशीक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. वडील काय किंवा मुलगा काय. तरुणांना संधी दिली पाहिजे. तरुण चांगेल काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे,' असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

'शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचं राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले,' असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काल पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. 'मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी हा कट रचण्यात आला. आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले,' असे आरोप त्यांनी केलेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.