Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी..

पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी..


पुणे : पुण्यातील गुगलच्या कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण कार्यालयाची व परिसराची तपासणी केली. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या पथकाने हा फोन करणार्‍याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे. पुण्यात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याच्या भावानेच हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पुण्यातील मुंढवा परिसरात एका बहुमजली व्यावसायिक इमारतीमध्ये ११ व्या मजल्यावर गुगलचे कार्यालय आहे. हे कार्यालय गेल्याचवेळी सुरु करण्यात आले आहे. मुंबईतील गुगलच्या कार्यालयात रविवारी रात्री फोन आला. त्यात फोन करणार्‍याने पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्ब ठेवला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुगलने ही बाब तातडीने मुंबई पोलिसांना कळविली. मुंबई पोलिसांनी ही बाब पुणे पोलिसांना कळविली. त्यानंतर तातडीने मुंढवा पोलीस व बॉम्बशोधक आणि नाशक पथक गुगलच्या कार्यालयात पोहचले. 

त्यांनी संपूर्ण कार्यालय, इमारत, परिसराची तपासणी केली. मात्र, काहीही आढळून आले नाही. त्याचदरम्यान, मुंबई पोलिसांनी फोन करणार्‍याचा शोध घेतला असता तो हैदराबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले. हैदराबाद पोलिसांच्या मदतीने हा व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. तो पुण्यात गुगल कार्यालयात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याचा भाऊ असून त्याने मद्यधुंद अवस्थेत फोन केल्याची कबुल दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.