Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा

सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठी इंडस्ट्रीच नाही तर तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषिक चित्रपटात काम केले आहे. सयाजी शिंदे अभिनया शिवाय सामाजिक कार्यामुळेही चर्चेत येत असतात. मात्र यावेळेला ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे आणि त्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जगणारही आहे. त्यांनी नेमके काय केले असेल, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना... याबद्दल त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. सयाजी शिंदेंनी आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या वजनाइतक्या बिया लावण्याचा निर्धार केला आहे. एका कार्यक्रमात आईबद्दल बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, 'माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे. प्रत्येकाला वाटते त्याची आई खूप जगावी. माझी आई आयुष्यात कायम जिवंत राहायला हवी आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. मग ती कशी राहील? मी आईला म्हटले बघ तू काय ५०० वर्षे जगणार नाहीस. मला तू कायम जिवंत राहायला हवीस.

ते पुढे म्हणाले की, मी एक काम करतो तुझ्या वजनाइतक्या देश झाडांच्या बियांची तुला करतो. एका बाजूला तुला ठेवतो. एका बाजूला बिया ठेवतो आणि तुझ्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रात लावतो. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील. त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील, सावलीत असशील आणि कायम राहशील.

तसेच त्यांनी सांगितले की, 'झाडं लावायचे मी काही सामाजिक काम करत नाही. मला आवड आहे ती आणि आईला मी वचन दिले आहे तुझ्या वजनाएवढ्या बिया लावेन म्हणून मी ते काम करतो. मला वाटते प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचे ऋण फेडायचे असेल तर माता आणि धरतीमाता यांच्याइतकी मोठी गोष्ट जगात नाही. तेवढे आपण सांभाळले तर बस आहे. आपण खूप मोठे झालो. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सयाजी यांनी 'सहयाद्री देवराई'च्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील अनेक माळरानांवर झाडं फुलवली आहेत आणि ती जगवलीही आहेत..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.