Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ॲट्रासिटी प्रकरणात मुदतीत चार्जशीट दाखल करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

ॲट्रासिटी प्रकरणात मुदतीत चार्जशीट दाखल करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी 


सांगली दि. १७  :-  पोलीस विभागाने ॲट्रॉसिटी प्रकरणातील तपास तातडीने करून मुदतीत चार्जशीट दाखल करावे. फिर्यादीचा जातीचा दाखला लवकर उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. 

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा सरकारी वकील ॲड. अरविंद देशमुख यांच्यासह पोलीस व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिडीत लाभार्थीला आर्थिक मदत देण्यासाठी निधीची मागणी करावी, जी प्रकरणे कागदपत्राअभावी अर्थसहाय्यासाठी प्रलंबित आहेत, अशा प्रकरणांच्या कागदपत्राच्या पूर्ततेसाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियामानुसार प्राप्त तक्रारीमधील पोलीस तपासावर व न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा प्रकरणांचा आढावा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

अत्याचार पिढीतांच्या 38 प्रकरणांमध्ये 21 लाख 50 हजार पहिल्या हप्त्याकरिता आणि दुसऱ्या हप्त्याकरिता 10 प्रकरणांमध्ये 9 लाख रुपये आर्थिक सहाय्य मंजूर केले असून आणखीण 20 लाख रुपयांची  मागणी करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री. चाचरकर यांनी बैठकीत दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.