आधार कार्डच्या मदतीने तपासा बँक खात्यातील रक्कम
नवी दिल्ली : सध्याच्या डिजिटल युगात आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी महत्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड सर्व सोयी-सुविधांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये बँकिंग आणि सरकारी सेवांचा समावेश आहे. आधार कार्डला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक लिंक असल्यास तुम्हाला मोठा फायदा होतो. तुम्हाला बँकेच्या खात्यातील रक्कम तपासण्यासाठी बँकेत जाण्याची, एटीएमवर जाऊन खात्यातील रक्कम तपासण्याची गरज नाही. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला बँक खात्यातील रक्कम तपासता येते. आधार कार्ड आता जवळपास सर्वच योजनांशी लिंक असते. या योजनेच्या अपडेट तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून कळतात. आधार कार्डवर प्रत्येक व्यक्तिचे नाव, जन्म तारीख, लिंग, घराचा पत्ता आणि फोटो असतो.
तुम्ही 12 आकड्यांचा आधार कार्ड क्रमांकाचा वापर करुन बँक खात्यातील बॅलन्स चेक करु शकता. त्यासाठी बँकेच्या शाखेत, एटीएमवर जाण्याची काहीच गरज नाही. घरबसल्या तुम्हाला खात्यातील रक्कम तपासता येते. आधार कार्डच्या युझर्सला बँकेचे केवळ बॅलेन्सच चेक करता येत नाही, तर रक्कम ही दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करता येते. सरकारी मदतीसाठी विनंती पाठविता येते. तसेच पॅन कार्ड मिळविण्यासाठी आधारा कार्डचा वापर करता येतो.
बँक खात्यातील बॅलन्स तपासायचा असेल तर सोपी प्रक्रिया आहे. त्याआधारे तुम्हाला खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येईल. सर्वात अगोदर वापरकर्त्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन *99*99*1#- यावर कॉल करावा लागेल. हा क्रमांक डायल केल्यानंतर त्याच्या आधार कार्डाचे 12 आकडे टाकावे लागतील. त्यानंतर आधार क्रमांक पुन्हा टाकावा लागेल. हा क्रमांक व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर सर्वात शेवटी UIDAI च्या स्क्रीनवर तुम्हाला बँक बँलेन्स फ्लॅश एसएमएसच्या माध्यमातून दिसेल.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अजून काही सेवांची घोषणा केली आहे. त्यानुसार, आधारच्या माध्यमातून इतर सेवा घरपोच देण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. लवकरच ग्राहकांना अनेक सेवा घरपोच मिळतील. यामध्ये आधारकार्डची माहिती अपडेट करता येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.