Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘अमूल’भाजपच्या ताब्यात, काॅग्रेसचा गड ढासळला..

‘अमूल’भाजपच्या ताब्यात, काॅग्रेसचा गड ढासळला..




फोडाफोडीचे राजकारण करणाऱया भाजपने आता सहकारी संस्थांवरही कब्जा मिळविण्यास सुरुवात केली आहे. देशातील पहिली डेअरी सहकारी संस्था असा नावलौकिक असलेली गुजरातमधील अमूल डेअरी तब्बल 77 वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र, आता काँग्रेसच्या संचालकांना पह्डून भाजपने 'अमूल'चा ताबा घेतला आहे.

गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 वर्षे मुख्यमंत्री असतानाही अमूल डेअरी कधी भाजपच्या ताब्यात आली नव्हती. भाजपने गुजरातमधील 18 दूध सहकारी संस्थांवर ताबा मिळविला. मात्र, सर्वांत मोठय़ा अमूल डेअरीवर स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता होती. 1946 ला खेडा जिह्यात सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन झाला. 'अमूल डेअरी' नावाने या ब्रँडला देशभरात प्रसिद्धी मिळाली. तब्बल 77 वर्षे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. या डेअरीमुळेच आनंद आणि खेडा हे दोन जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले गेले.

पाच संचालक फोडले

* काँग्रेसचे माजी आमदार रामसिंह परमार हे 2002 पासून अमूल डेअरीचे चेअरमन होते. तब्बल पंधरा वर्षे चेअरमन राहिलेल्या परमार यांनी 2017ला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही काँग्रेसचीच सत्ता अमूल डेअरीवर होती.

* 2020च्या दूध संघ निवडणुकीत 11 पैकी आठ जागा जिंकून काँग्रेसची सत्ता कायम राहिली. गेल्यावर्षी काँग्रेसचे संचालक, माजी आमदार कांती परमार सोढा हे भाजपमध्ये गेले. त्यानंतर गेल्या आठवडय़ात 11 फेब्रुवारीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे चार संचालक फोडले. जीवनसिंह चौहान, सीता चंदू परमार, शारदा हरी पटेल आणि घेला मानसिंह झाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

* आता भाजपचे विपुल पटेल हे अध्यक्ष आणि काँग्रेसमधून गेल्यावर्षी भाजपवासी झालेले कांती परमार सोढा हे उपाध्यक्ष झाले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.