Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: डॉक्टरांच्या गैरहजेरीत शिपायांकडून उपचार..

सांगली: डॉक्टरांच्या गैरहजेरीत शिपायांकडून उपचार..


सांगली महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमध्ये औषध निर्माता व शिपाई यांच्याकडून रूग्णावर औषधोपचार करण्याचा धक्कादायक प्रकार आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे शनिवारी उघडकीस आणला.

महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक सातमध्ये आम आदमी पक्षाचे जिल्हा शहर संघटक फय्याज सय्यद व युवा आघाडीचे अध्यक्ष ख्वाजासाहेब जमादार हे शनिवारी पाहणीसाठी गेले होते. यावेळी या ठिकाणी नियुक्तीस असणारे वैद्यकीय तज्ञ गेल्या चार दिवसापासून रजेवर होते. तरीही केंद्रावर कार्यरत असलेले औषध निर्माता व शिपाई यांच्याकडून तपासणीसाठी आलेल्या रूग्णांवर औषधोपचार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. रूग्णांना मलमपट्टी व औषधे दोघेच देत होते.

आरोग्य केंद्रावर डॉक्टर उपलब्ध नसल्याचा फलकही लावण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही. आपचे संघटक श्री. सय्यद यांनी रजेवर असणार्‍या डॉक्टरांना फोनवरून संपर्क करून या घटनेचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी असा प्रकार पुन्हा घडणार नाही अशी हमी दिली. सय्यद यांनी आरोग्य विभागाचा निषेध व्यक्त करीत सर्वसामान्य नागरिकांना जर चुकीचे औषध दिले गेले व त्यातून काही बरे वाईट घडले तर याला जवाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.