Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वंचित बहुजन आघाडीचा राहुल कलाटेंना पाठिंबा?

वंचित बहुजन आघाडीचा राहुल कलाटेंना पाठिंबा?


ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली असताना आता चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत वंचितच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यातच चिंचवडमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यामुळे वंचित वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बुधवारी पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र या बैठकीनंतरही वंचित राहुल कलाटेंना पाठिंबा देण्यावर ठाम असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप पाठिंबा मागितलेला नसल्यामुळे, वंचित आज निर्णय जाहीर करण्याचीही शक्यता आहे. दरम्यान 2019 साली वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता आणि प्रकाश आंबेडकरांनी तेव्हा तीन सभाही घेतल्या होत्या. त्यामुळे, या खेपेला वंचित बहुजन आघाडी राहुल कलाटेंना पाठिंबा देऊ शकते, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र कसबा मतदारसंघाबाबत अद्याप वंचितने कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिलाय. गेल्या काही दिवसांत मनसेची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात मनसे आणि भाजप, शिंदे गटाशी युती होणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला दिलेला पाठिंबा हे त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता, मनसेने आपली भूमिका बदलली असून, ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समोर येत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचं वावडं नसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

राहुल कलाटेंमुळे निवडणूक चुरशीची

महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केल्यानंतरही राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. ते चिंचवडमध्ये आता शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना नाना काटे यांच्यापेक्षा जास्त मतं पडले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला तर अधिक मतं पारड्यात मिळवता येईल, असा विचार महाविकास आघाडीकडून सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.