Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कसबेडिग्रजमध्ये महिलेस मारहाण..

कसबेडिग्रजमध्ये महिलेस मारहाण..


सांगली, ता. १६:
शेतातील रस्त्यावरुन जाण्याच्या कारणातून झालेल्या वादावादीत महिलेस मारहाण करण्यात आल्याचा प्रकार कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे घडला. याप्रकरणी ललिता भालचंद्र वाडकर (रा. पाण्याच्या टाकीनजीक, कसबे डिग्रज, ता. मिरज ) यांनी फिर्याद दिली. संशयीत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले. यात प्रकाश रघुनाथ मोहिते (वय ६०), कुणाल प्रकाश मोहिते (३५), छाया प्रकाश मोहिते (५५), सारिका कुणाल मोहिते (३०) आणि स्नेहल पृथ्वीराज मोहिते (२६ रा. सर्व पाण्याच्या टाकीनजीक, कसबे डिग्रज) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले, की ललिता वाडकर या जनावरांना वैरण टाकण्यासाठी सायंकाळच्या सुमारास जात असता त्यांच्या शेजारी राहणारे प्रकाश मोहिते यांनी या रस्त्याचा वापर करायचा नाही असे त्यांना सांगितले. यावरुन त्यांच्यात वादावादी सुरु असताना संशयीत कुणाल आणि छाया मोहिते यांनी फिर्यादी ललिता वाडकर यांना मारहाण केली. तसेच सारिका आणि स्नेहल मोहिते यांनीही फिर्यादी वाडकर यांचे केस ओढले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.