Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट...

संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट...


'त्या दिवशी 20 आमदार आणि 10 मंत्री मातोश्रीवर होते'

01 फेब्रुवारी : 'ज्या वेळी शिवसेना फुटली तेव्हा ठाकरे गटाचे आमदार फुटले असल्याचे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार आणि 10 मंत्री गेले होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटात सामील झालेले आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी उघडपणे मातोश्रीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता पुन्हा एकदा गायकवाड यांनी सेनेवर टीका केली.

'मुख्य शिवसेना मधून काही आमदार फुटले ते सांगण्यासाठी 20 आमदार आणि 10 मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर गेले होते. मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी सांगितले जे गेले ते गेले आणि तुम्हाला ही जायचं असेल तर जाऊ शकता, असं सांगितले होतं, असा गौप्यस्फोट आमदार संजय गायकवाड यांनी केला. 'ज्यावेळी आमदार नाराज होऊन बाहेर पडले, त्यावेळी मंत्री सुद्धा मातोश्री वर गेले आणि भेटले. उद्धव साहेबांना सांगितले की, हे लोक आपलेच आहेत, त्यांना परत बोलवा. मात्र संजय राऊत हा माणूस म्हणाला की जे गेले ते गेले.

आता त्यांना वापस बोलवण्याची गरज नाही. अत्यंत घाणेरड्या शब्दात तो बोलला म्हणून उरलेले सगळेच लोक निघून गेले. राऊतांच्या अशा वागण्यामुळे सगळे गेले. उध्दव साहेबांवर काय पगडा होता, त्यावेळी उद्धव साहेब काही बोलू शकले नाही. याला कारणीभूत संजय राऊत असून राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, असा आरोपच गायकवाड यांनी केला. मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, ही त्यांची आमची अपेक्षा आहे पण अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. बाकी विकासाचे कामे चालू आहेत, काहीही ठप्प नाहीत, असंही गायकवाड म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.