पाईपलाईनद्वारे गॅस दराचा भडका..!
इचलकरंजी : घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस योजनेत अव्वाच्या सव्वा दराने सरसकट आकारणी केलेली बिले हातात पडल्याने इचलकरंजीतील लाभार्थी चांगलेच भडकले आहेत. दोन महिन्यांत पाच ते सहा हजारांदरम्यान विल आकारणी केल्याने गॅसधारक चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे भडकलेले ग्राहक कनेक्शन बंद करण्याची मागणी करीत आहेत. इचलकरंजी शहरात एच.पी. ऑईल कंपनीने पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा सुरू केला आहे. पहिल्या रण्यात कामगार चाळीतील ३०० ग्राहकांना कनेक्शन जोडण्यात आली. सिलिंडरपेक्षा तीनशे ते चारशे रुपयांनी गंस स्वस्त मिळणार म्हणून नागरिकांनीही कनेक्शन घेण्यास रिघ लावली.
पहिल्या महिन्यात कंपनीने दावा केल्याप्रमाणे सिलिंडरपेक्षा विल कमी आल्याने नागरिकांनी या योजनेचे स्वागत केले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. जानेवारी महिन्यात मागील दोन महिन्यांची एकत्रित विले ग्राहकांना पाठविण्यात आली. विले हातात पडल्यानंतर ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. तीन हजारांपासून साडेसहा हजारांपर्यंत बिल आकारणी केली आहे.
त्यामुळे टाकीतील गॅस बरा, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. टाकीतील गॅस १,०५० रुपयांना मिळतो. एका कुटुंबास एक गॅसची टाकी २५ ते २७ दिवस पुरत होती. गॅस पाईपलाईनद्वारे मिळालेल्या गॅससाठी महिन्याला सरासरी दोन ते अडीच हजार रुमोजण्याची वेळ आली आहे. आधीच मंदीच्या गर्तेत सापडलेले इचलकरंजीकर संसाराचा गाडा चालविताना मेटाकुटीला आले आहेत. त्यातच गॅसचा अतिरिक्त भार सोसवेनासा झाल्याने ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही अन्यायी वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.