Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औरंगाबादमध्ये आरोपीची पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ

औरंगाबादमध्ये आरोपीची पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ


औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना गुन्हेगारांची हिंम्मत देखील वाढत चालल्याचे पहायला मिळत आहे. चोरी, दारु, वेश्याव्यवसाय , जाळपोळ असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस अधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप स्वत:च्या सोशल मीडियावर व्हायरल देखील केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. जीवन केसरसिंग जारवाल राजपूत (वय-24 रा. बेंबल्याची वाडी, ता. औरंगाबाद) असे ताब्यात घेण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

आरोपी जीवन राजपूत जाळपोळ आणि शरिराविरुद्धच्या गुन्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याने एका हॉटेलमध्ये आग लावून हॉटेल जाळले होते. तसेच इतर काही गुन्ह्यांमध्ये चिकलठाणा पोलीस त्याच्या मागावर होते. पोलीस आल्याचे समजताच तो प्रत्येकवेळी पळून जात होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिकलठाणा पोलीस ठाण्यातील एक पथक हद्दीत त्याचा शोध घेत होते. त्यावेळी एका ठिकाणी त्याचा साथीदार पोलिसांना दिसला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्या साथीदाराने राजपूत याला फोन लावून दिला. त्यावेळी राजपूत याने पोलीस अधिकाऱ्याला फोनवर शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. 

दोन स्टार लागले म्हणजे डॉन झाला का?

आरोपी जीवन राजपूत याने पोलीस अधिकाऱ्याला फोनवर शिवीगाळ करताना म्हणाला, पीएसआय आहे म्हणून माजला का? तुझ्यात दम असेल तर मला अटक कर, माझ्यात दम असून, तुला मी मारणार म्हणजे मारणारच. तू टोले खाणार आहे. माझी खूप लहान केस आहे, मला तुम्ही उगाच परेशन करु नका, मला अटक करा आणि आतमध्ये टाका हे तुम्हाला आधीच सांगितले होते. मी मागे सरकत नाही. तुला दोन स्टार लागले म्हणजे तू डॉन झाला का? मी एकटा येऊन तुला भिडतो, कुठ भिडायचं सांग… औरंगाबादमध्ये मी सहा ठिकाणी धंदे करतो. लपून-छपून धंदे मी करत नाही, असे या ऑडिओ क्लिप मध्ये आरोपी जीवन राजपूत पोलीस अधिकाऱ्याला बोलत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.