‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ मध्ये नोकरीची मोठी संधी..
बॅंके मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बॅंक (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार sbi.co.in/careers आणि sbi.co.in वर अर्ज करु शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे. R&Python,Sequel मध्ये अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच फर्स्ट डिव्हिजन (६०%) आणि (स्टेटिस्किक्स/गणित/अर्थशास्त्र) या विषयात पोस्ट ग्रज्युएट तर बी.टेक (आयटी/सीएस), पी.जी झालेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. कंप्यूटर किंवा पीजीडीसी आणि एमआयएसमध्ये डिप्लोमा असणे गरजेचं आहे. या पदांसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी २५ आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे असलं पाहिजे.
उमेदवारांना एसबीआयईची वेबसाईट bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि इंटरनेट बॅकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यांचा वापर करुन अर्ज भरण्यासाठीचे शुल्क द्यावे लागेल. जयपूरमध्ये या पदासाठी नोकरी मिळेल. सीनियर एग्जीक्यूटिव स्टेटिस्टिक्स या पदासाठी ही नोकरीची संधी आहे.
उमेदवाराची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल. त्यानंतर सीटीसीबद्दल माहिती दिली जाईल. एसबीआयचे भरती अभियान एका वॅकेन्सीसाठी आहे. म्हणजेच या भरती प्रक्रियेतून एक पद भरलं जाईल. ज्या लोकांना नोकरी मिळेल त्यांचं अप्रेजलही केलं जाणार. अप्रेजल प्रत्येक सहा महिन्यांनी केलं जाईल.
नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे की, या पदासाठी नोकरी मिळवलेल्या उमेदवाराला १५ ते २० लाखांचा वर्षाला पॅकेज दिला जाईल. बॅंकेकडून भारतीय स्टेट बॅंकेच्या कोणत्याही कार्यालयात नोकरीच्या पोस्टचा आणि ट्रांसफरबाबतचे अधिकार सुरक्षित ठेवले जातात. कॉन्ट्रॅक्टचा अवधी ३ वर्षे आहे. पण १ वर्षासाठी हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.