गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द काढल्याप्रकरणी सोलापूर शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान संहितेतील कलम 153 अ 499, 500, 506, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा अर्ज पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.
'मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शहर प्रमुख असून माझे श्रद्धास्थान व आदर्श असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अनिलचंद्र शहा यांनी अपशब्द व बदनामकारक व्यक्तव्य केले. त्यामुळे माझ्यासह माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.अशा वक्तव्यामुळे देशात शांततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याप्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित अनिलचंद्र शहा यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेतील कलम 153 499 500 आणि 506 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावी ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आलेले आहे. सदर तक्रारी अर्ज दाखल करताना विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह मुनीर रंगरेज, विठ्ठल कुराडकर, जुनैद चांदा, नागार्जुन कुसुरकर, पप्पू शेख व शिवसैनिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.