Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"ज्यांना चिन्ह नाही मिळालं त्यांना." पंकजा मुंडे यांनी स्पष्टचं सांगितलं

"ज्यांना चिन्ह नाही मिळालं त्यांना." पंकजा मुंडे यांनी स्पष्टचं सांगितलं


मुंबई: केंद्रीय निवडूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले. या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांची पुढील रणनीती नेमकी कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय वर्तुळातून देखील याबाबत तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवरात्री निमित्त पंकजा मुंडे यांनी बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या,”आज शिवरात्री असल्यामुळे मी राजकीय बाईट देणार नाही. फक्त एवढंच सांगेन,ज्यांना चिन्ह मिळालं त्यांना आणि ज्यांना चिन्ह नाही मिळालं त्यांना.. दोघांनाही या निर्णयाला पुढे नेण्याची ईश्वर शक्ती देवो” अशा मोजक्या शब्दात मुंडे यांनी आपले मत मांडले.

एकनाथ शिंदे 40 आमदारांसोबत बाहेर पडत भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आपला दावा केला. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत केले जात आहे. तर या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

पंकजा मुंडे चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत. यावेळी पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पुण्यासह पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.