Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांनी कोणाबद्दल असे वक्तव्य केले..

शरद पवारांनी कोणाबद्दल असे वक्तव्य केले..


रुपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या मानल्या जातात. रुपाली ठोंबरे या माजी नगरसेविका आहेत. शरद पवार यांना रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबद्दल विचारले असता, ती अतिशय भांडखोर आहे असे ते म्हणाले. शरद पवार यांनी असे बोलताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. शरद पवारही मनसोक्त हसायला लागले. शरद पवार एखाद्या व्यक्तीचे नाव घेतात आणि त्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात. त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. 

त्याच्याकडे एक जबरदस्त स्मरणशक्ती आहे आणि विशिष्ट शब्दांमध्ये व्यक्तीचे अतिशय समर्पक वर्णन करण्याची हातोटी आहे. शरद पवार यांना रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत विचारले असता, उपस्थित पत्रकारांनी शरद पवारांचा तोच स्वभाव अनुभवला. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत आज शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? असे शरद पवार म्हणाले, त्यानंतर पत्रकाराने रुपाली ठोंबरे पाटील असे म्हटल्यावर शरद पवार चटकन म्हणाले की, ती खूप भांडखोर आहे, पोलिस बोलू लागले तरी ती थेट त्यांच्या अंगावर जाते. तिला आवरावे लागते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.