Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई पाण्याखाली बुडणार?

मुंबई पाण्याखाली बुडणार? 


गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईला भूकंप व जलप्रलयाचा धोका असल्याची भीती अनेक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. तुर्की व सीरियामधील भूकंपाप्रमाणे भारतात विनाशकारी भूकंप झाल्यास काय परिस्थिती असेल याचेही अंदाज वर्तवले जात असताना आता जिनेव्हामधील जागतिक हवामान विज्ञान संघटनेनं म्हणजेच  जारी केलेल्या एका नव्या अहवालात भारत, चीन आणि बांगलादेश तसेच नेदरलंडला जागतिक पातळीवरील समुद्रातील पाणी पातळी वाढीचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं आहे. 

या देशातील अनेक भूभाग समुद्राच्या उदरात सामावू शकतात अशी भीती वर्तवली आहे. वेगवेगळ्या खंडांमधील अनेक मोठी शहर समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने बुडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, शांघाय, ढाका,  बँकॉक, जकार्ता,  लागोस, काहिरा, लंडन, कोपेनहेगन, न्यूयॉर्क, आदि मोठ्या शहरांचा समावेश आहे. समुद्रकिनाऱ्यावरील अनेक देशांना पाण्याची पातळी वाढल्यास सर्वात मोठा फटका बसू शकतो, असं अहवालात म्हटलं आहे. डब्ल्यूएमओच्या या अहवालाचं नाव 'ग्लोबल सी-लेवल राइज अॅण्ड इम्प्लीकेशन्स' असं आहे. 

डब्ल्यूएमओच्या या अहवालानुसार समुद्रातील पाण्याची पातळीत होणारी वाढ हे जगासमोर भीषण संकट आहे. मात्र हे संकट आर्थिक, सामाजिक आणि मानव निर्मित असल्याचे अहवालात म्हटलं आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील शेती व जलसाठे तसेच पायाभूत सुविधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समुद्री वादळांचे व हवामान बदलाचे प्रमाण वाढून किनाऱ्यांना अनेक वादळे धडकू शकतात. जलवायू परिवर्तन आणि समुद्र पातळी वाढल्याने अंटार्टिकामधील सर्वात मोठा ग्लॅशियर (हिमखंड) वितळण्याची गती ही अनिश्चित आहे असं अहवालात म्हटलं आहे.

लोकांच्या उदरनिर्वाहावर होणार परिणाम –

समुद्रामधील पाण्याची पातळी वाढल्याने संपूर्ण जगभरामध्ये याचे वेगवेगळे परिणाम दिसतील. याचे परिणाम स्थानिक पातळीवर वेगळे असतात. समुद्रातील पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या शहरांबरोबरच पायाभूत सेवांवर परिणाम होऊन किनाऱ्यावरील अनेक गावे व शहरांचे भाग पाण्याखाली जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याचा अन्नधान्य उत्पादनावर व मासेमारीवर परिणाम होईल. 

या अहवालानुसार जागतिक स्तरावर समुद्राच्या पाण्याची पातळी २०२० च्या तुलनेत ०.१५ मीटरने वाढली. तर येत्या शतकात समुद्राची पाणी पातळी वाढून प्रभावित लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढेल. त्याचपद्धतीन समुद्राची पाणीपातळी ०.७५ मीटरची वाढ झाल्यास  ४० टक्के आणि १.४ मीटरपर्यंत वाढल्यास जगातील एकूण ६० टक्के लोकसंख्येला फटका बसेल. या अहवालानुसार २०२० पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या ११ टक्के लोक उथळ समुद्र किनाऱ्यांजवळ राहतात. येत्या ३० वर्षात ही लोकसंख्या १ बिलियनहून अधिक असेल, असे म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.