Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची विनंती करत माफी..

गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची विनंती करत माफी..


पूर्वी मी अनेकदा चुकले आणि त्यसाठी माफी देखील मागतली आहे. त्यामुळे मी आता माझ्या नृत्य शैली मध्ये बदल केले आहेत. अजितदादा खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. दादा मी चुकले पण आता मी माफी मागते अशा भाषेत गौतमी पाटील ने विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांची माफी मागितली.

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना भुरळ घातली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावचा कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिलं निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडले, त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. त्यानंतर आता गौतमी पाटीलचा व्हिडीओ समोर आला आहे. तसंच प्रेक्षकांनी देखील माझे जुने व्हिडिओ काढून मला ट्रोल करू नये, मी जे चांगलं केलं त्यावरही लोकांनी बोलावं, अशीही विनंती देखील गौतमी पाटीलने केली.

'राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं अजितदादा म्हणाले होते.

तसंच, 'आता असे कार्यक्रम ठेवण्याची स्पर्धाच लागली आहे. अशा कार्यक्रमांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच बोर्ड असतो. हे योग्य नाही. आम्ही जिल्हाप्रमुख पदाधिकारयांना तशा सूचना देण्यात येतील' असा तंबीही अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.