Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारत-पाकिस्तान सीमेवर तारांच्या कुंपणाला बिअरच्या बाटल्या का टांगतात?

भारत-पाकिस्तान सीमेवर तारांच्या कुंपणाला बिअरच्या बाटल्या का टांगतात?


सीमा सुरक्षा दलाचे जवान भारत देशाच्या सीमेवर रात्रंदिवस गस्त घालून देशाचं संरक्षण करत असतात. थंडीच्या दिवसात धुक्याची चादर पसरल्यावर आजूबाजूच्या परिसरातील दृष्य दिसेनासं होतं. पण हेच जर सीमा सुरक्षा भागात असेल, तर परिस्थिती किती गंभीर होते, याचा आपल्याला अंदाजही लावता येणार नाही. याच कारणामुळं भारत-पाकिस्तान सीमेवर हायअलर्ट घोषीत केलं जातं. पाकिस्तानच्या सैन्यांकडून घुसखोरी किंवा कोणत्याही प्रकारची चकमक होऊ नये, यासाठी सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात येतं. पण आता एक देसी जुगाड सीमेवर करण्यात येत आहे. सीमेवर असणाऱ्या तारांच्या कुंपनाला बिअरच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या का लावल्या जातात, यामागचं कारण वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सीमेवरील कुंपणाला बिअरच्या रिकाम्या बाटल्या लावतात, यामागचं कारण 

बीएसएफने राजस्थानपासून जम्मूपर्यंत तारेच्या कुंपणाला काही अंतरावर काचेच्या रिकाम्या बाटल्या टांगल्या आहेत. जर कुणी या तारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तर तारांना लावलेल्या बाटल्यांची एकमेकांना टक्कर होईल आणि अलार्म वाजेल. यामुळे जवानांना दुश्मनांच्या घुसखोरीबाबत माहिती मिळते आणि सीमेवर जवान अलर्ट होतात. बाटल्यांच्या वापर अशाप्रकारे केल्यामुळं धुक्याचं वातावरण असल्यावरही दुश्मन देशात घुसघोरी करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.