Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी - मंत्री शंभूराज देसाई

अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी - मंत्री शंभूराज देसाई


मुंबई : राज्यात होणारी अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करताना अवैध मद्याची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली अवैध मद्य विक्रीसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, परराज्यातून अवैधरित्या होणारी मद्य वाहतूक, विक्री याला आळा घालण्यासाठी राज्याच्या सीमेवरील संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. विभागाच्या माध्यमातून महसुली स्रोत वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.