प्रकाश आंबेडकर यांचा अमित शहांना इशारा..
मोदी आणि शहांचे राजकारण हे द्वेषाचे राजकारण आहे. ते आता आमच्याही मागे लागण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु असे अनेक आले आणि गेले. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असा इशाराच आज वंचित बहुजनचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांना दिला.
राजगाव येथील धम्म परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात निवडणुकीत थोडी दयामाया होती, मात्र आताचे भाजप सरकार लोकांना विकत घेण्याची भाषा वापरते. हे सरकार व्यापाऱयांचे, दलालांचे आहे. मोदी-शहा खुनशी हव्यासापोटी दबावतंत्र वापरून विरोधकांना संपवत आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
पन्नासहजाररुपये
एकनाथ शिंदे आणि भाजपवाले पैशांच्या जोरावर मतदारांना विकत घेण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे मतदारांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत ठराव घेऊन भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 'एका मताला पन्नास हजार रुपये द्या, नाही तर चालते व्हा' असा बोर्ड लावावा, असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला.
फडणवीससंतापलेत
मुख्यमंत्रीपदाचा तोंडचा घास हिरावल्याने देवेंद्र फडणवीस संतापले आहेत. त्यांच्या सभेत मुख्यमंत्री कोण अशा घोषणा द्या, मग बघा काय होते ते, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.