Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मान्सूनबद्दल हवामान विभागाची धक्कादायक माहिती..

मान्सूनबद्दल हवामान विभागाची धक्कादायक माहिती..


मुंबई, 15 फेब्रुवारी : राज्यात मागच्या 5 वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कुठेही दुष्काळाची परिस्थिती दिसून आली नव्हती. दरम्यान महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी वादळाची स्थिती निर्माण होत असल्याने तुफान पाऊस व्हायचा.

परंतु यंदा क्षमतेपेक्षा पाऊस कमी होणार असल्याचे हवामान तज्ञानी शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात सलग तीन वर्षे चांगला मान्सून दिल्यानंतर 'ला-नीना' हे वादळ आता निरोप घेत आहे. पुढील तीन महिने म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे. अमेरिकन संस्था नॅशनल ओशिनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, मे ते जुलैदरम्यान 'अल-नीनो'ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो.

जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. तज्ज्ञांनुसार, अल-नीनो वर्षांमध्ये दुष्काळाची शक्यता 60 टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के व केवळ 10 टक्के सरासरी पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 26 वर्षांत 5 वेळा अल-नीनो स्थिती राहिली आहे. त्यामध्ये चार वेळा देशात दुष्काळ पडला. 2002 मध्ये भारतात 81 टक्के, 2009 मध्ये 78 टक्के पाऊस झाला. दरम्यान आता अल-नीनो प्रभावाचा पुढील 9महिन्यांसाठी अंदाज उपलब्ध आहे. 2004, 2009, 2014 व 2018 मधील अंदाजही 2023 सारखेच आहेत. यामुळे मागच्या काही काळात दुष्काळ झाला त्या प्रमाणे 2023लाही दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.