Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !


धुळे :   घरात कोणीही नसल्याचे पाहून पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना साक्री रोडवरील श्रीहरी कॉलनीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. महावीर सखाराम भदाणे (वय ५४) असे मृत पोलिसाचे नाव आहे. धुळ्यातील साक्री रोडवर श्रीहरी कॉलनीत महावीर भदाणे आपल्या परिवारासोबत राहतात. सध्या ते पोलिस मुख्यालयात नेमणुकीला आहेत.

शुक्रवारी सायंकाळी ते घरात एकटेच होते. त्यावेळी त्यांनी घरातील खालच्या बैठक हॉलमध्ये घराच्या छताला असलेल्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. घरात सदस्य आल्यानंतर घटना लक्षात येताच खासगी वाहनाने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात त्यांचा मुलगा सागर महावीर भदाणे यांनी फिर्याद दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.