Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"अदानी घोटाळ्यात भाजपचा.."

"अदानी घोटाळ्यात भाजपचा.."


देशात 50 वर्षांतील मोठा स्कॅम; संसदेत आवाज उठवणार, संजय राऊत यांचा इशारा, राऊत म्हणतात.

नवी दिल्ली: आज नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अदानी तसेच अर्थसंकल्पावरुन भाजापवर निशाणा साधला. उद्योगपती गौतम अदानी यांचा सध्या जो एक घोटाळा समोर येत आहे, त्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपचा थेट संबंध आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. देशात गेल्या 50 वर्षांत असा स्कॅम, मोठा घोटाळा झाला नाही. या घोटाळ्याशी सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे. या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक सरकारला जाब विचारणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले?

दरम्यान, मोदी मुंबईला वारंवार येत असतात, मात्र कालच्या अर्थसंकल्पात मुंबईला फक्त गाजर दाखविले. केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, मुंबई व महाराष्ट्रासाठी आम्ही अनेक मागण्या केल्या होत्या. मात्र, चमचाभर हलवाही वाट्याला आला नाही. हे पूर्णपणे भाजपच्या निवडणुकीचे बजेट होते. मुंबईचे औद्योगिक अध:पतन करण्याचे कारस्थान, या बजेटमधून समोर येत आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असं राऊत म्हणाले.

विरोधकांना नामोहरम करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर

केवळ विरोधकांवर आरोप करुन त्यांना कैदेत ठेवण्यासाठीच तुरुंग बनवले आहेत काय? भाजप नेत्यांकडून नेहमी विरोधकांवर मनी लाँड्रिंग, शेल कंपन्यांचा आरोप केला जातो. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयच्या धाडी लावल्या जातात. आताही एका उद्योजकाच्या सिंगापूर, मॉरिशस येथे शेल कंपन्या असल्याचे समोर येत आहे. यावर एकाही भाजप नेत्याने अद्याप आवाज का उठवला नाही? फक्त विरोधकांना नामोहरम करण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर केल जात असल्याचा आरोप राऊतांनी केला

भाजप देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करतंय

अदानीसारखे घोटाळे समोर आल्यानंतर सामान्यांच्या पैशांचे काय?, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत. भाजप देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्याचे काम करत आहे. शेअर मार्केटवरुन देशाचा विकास अधोरेखित करण्याचा कट रचला जात आहे. खरे तर शेअर मार्केट आणि सामान्यांचा काही संबंध नाही. सामान्यांनी मोठ्या विश्वासाने आपले पैसे एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियात गुंतवले आहेत. मात्र, हे सरकार या पैशांचा शेअर मार्केटमध्ये इतरांसाठी वापर करत असल्याचे दिसत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.