हैद्राबादच्या भक्ताकडून साईचरणी नवरत्न जडीत सुवर्ण हार अर्पण..
हैदराबाद येथील साईभक्त भूपाल कामेपल्ली आणि राजलक्ष्मी कामेपल्ली यांनी शिर्डी येथील साई चरणी ३१० ग्रॅम वजनाचा तब्बल २० लाख रुपये किमतीचा नवरत्न जडीत सुवर्णहार अर्पण केलाय. रविवारी सकाळी कामेपल्ली कुटुंब हैदराबादहून शिर्डीत दाखल झालं.
दुपारच्या सुमारास त्यांनी साईबाबा समाधी मंदिर येथे आरती केली, व साईबाबांच्या दर्शनानंतर नवरत्न जडीत सुवर्णहार व चांदीची प्लेट व ग्लास या वस्तू साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने दानशूर कामेपल्ली कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. हा हार राजलक्ष्मी यांनी स्वतःच्या हाताने बनवला आहे. त्याचप्रमाणे ११७६ ग्रॅम वजनाचे ३१ हजार रुपये किंमतीचे चांदीचे ताट, वाटी, प्लेट, ग्लास तर २ लाख रुपये देणगीचा धनादेश देखील कामेपल्ली कुटुंबियांनी साई संस्थानला देणगी स्वरूपात दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.