अजित पवारांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली!
पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राणे यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. नारायण राणेंना एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली होती.
यावर निलेश राणे म्हणाले, तुम्हाला एका महिलेने जन्म दिला की तुम्ही कुठल्यातरी फटीतून पडलात. शरद पवारांना एका महिलेने आणि अजित पवाराच्या भाषेत एका बाईने त्यांची जागा दाखवली. अख्खी काँग्रेस एक बाई चालवते, अजित पवारांना महिलांचा अपमान करायचा आहे का?
तसेच अजित पवार म्हणजे मनाचा भिकाराडा माणूस. धरणाची अवलाद. असे म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यानंतर मात्र त्यांनी हे ट्विट डिलीट केले आहे. याचे स्क्रीन शॉट मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले लोक पुढे राजकारणात यशस्वी झाले नाहीत. हे सांगताना अजित पवार यांनी काही उदाहरणं दिली होती. यामध्ये छगन भुजबळ शिवसेनेतून १९ लोकांसह बाहेर पडले होते. त्यानंतर भुजबळ यांच्यासकट सगळं लोक पराभूत झाले.
नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. त्यांच्यासोबतचे पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार पडले. स्वत: नारायण राणे दोनदा पडले. एकदा कोकणात, दुसऱ्यांदा मुंबईतील उभे होते, तिथेही पडले. तिथे तर नारायण राणे यांना एका बाईने पाडलं, असे अजित पवार म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.