Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू घोटाळ्याचा पैसा गोवा निवडणुकीत वापरला!

दारू घोटाळ्याचा पैसा गोवा निवडणुकीत वापरला!


आम आदमी पक्षाने कथित दिल्ली दारू घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरला. असे अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. 'निधीचा काही भाग 'आप'च्या निवडणूक प्रचारात वापरण्यात आला होता.' असे तपासात दिसून आल्याचे ईडीने म्हटले आहे. गोवा विधानसभा निवडणूकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने संपूर्ण ताकद लावली. प्रचारात मोठा पैसा देखील खर्च करण्यात आला. निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दोन आमदार निवडून आले आहेत.

आम आदमी पक्षाच्या सर्वेक्षण टीममधील काही स्वयंसेवकांना तब्बल 70 लाख रूपये रोखड स्वरूपात दिले आहेत. प्रचारात सहभागी असलेल्या काही लोकांकडे हे पैसे दिले जायचे अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते विजय नायर यांनी ED ला दिली आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूकीत  विविध पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात दुसऱ्यांदा गोवा विधानसभा लढविणाऱ्या आपने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 3.5 कोटी रूपये एवढा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

कोणी किती रूपये केले खर्च?

तृणमूल काँग्रेसने गोवा निवडणूकीसाठी सर्वाधिक 47.54 कोटी रूपये खर्च केले आहेत. त्याखालोखाल राज्यात आज सरकार असलेल्या भारतीय जनता पक्षाने 17.75 कोटी रूपये खर्च केले. तसेच, काँग्रेसने तब्बल 12 कोटी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने  25 लाख रूपये आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने  गोवा निडणूकीसाठी 92 लाख रूपये खर्च केले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.