शंकराचार्यांनी सरसंघचालकांना सुनावले, 'तुम्हाला इतके ज्ञान कुठून मिळाले?'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत भाष्य केले होते. जातीव्यवस्था ही 'पंडितांनी' निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले.
दरम्यान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी शुक्रवारी मोहन भागवत यांच्यावर टीका केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शंकराचार्य म्हणाले की आरएसएस प्रमुखांच्या वक्तव्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली आहे. त्यांनी आता माफी मागितली तरी ते व्यर्थ ठरेल.
पुढे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, सरसंघचालक म्हणत आहेत की देवाने जात निर्माण केली नाही, ती पंडितांनी केली. मग तुमच्या म्हणण्यानुसार पंडित म्हणजे विद्वान, मग ब्राह्मण विद्वान नाही का? तुम्हाला इतके अफाट ज्ञान कुठून मिळाले? ते म्हणाले की भागवत यांना उशिरा ज्ञान मिळाले आहे. तुम्ही यावर संशोधन केले आहे का? भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेत सांगितले आहे की त्यांनी चार वर्ण निर्माण केले आहेत. वर्णानुसार त्यांच्यावर समाजात जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी यावर भाष्य करणे योग्य नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.