लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस..
नवी दिल्ली: देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्या कंपनीचे शेअर्स गडाडल्यामुळं लाखो रुपयांचे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. तसेच यूएसमधील हिंडनबर्गच्या अहवालामुळं अदानी समूहाला मोठा फटका बसला. गौतम अदानीना केंद्र सरकार पाठीशी घातल असून, यावर पंतप्रधान तसेच भाजपा मूग गिळून गप्प बसले आहेत, असं विरोधकांनी म्हटलं आहे. तसेच यांचे पडसाद मागील आठवड्यात लोकसभेत देखली उमटले.
राहुल गांधींना नोटीस.
दरम्यान, लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. अदानी मुद्द्यावर केलेल्या भाषणाबाबत नोटीस असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या नोटीशीला १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे. गौतम अदानीवरुन राहुल गांधी सभागृहात आक्रमक होत, केंद्र सरकार व मोदींवर टिका केली होती. यावेळी राहुल गांधींनी गौतम अदानी व मोदींचे एकत्र फोटो दाखवले होते. यामुळं त्यांना नोटीस पाठवली आहे.
15 फेब्रुवारीपर्यंत द्यावं लागणारउत्तर..
विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जातेय, असं विरोधकांनी म्हटलं आहे. गौतम अदानी यांचा मोठा घोटाळा असताना, यावर मोदी मौन बाळगून का आहेत? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला होता. दरम्यान, लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. अदानी मुद्द्यावर केलेल्या भाषणाबाबत नोटीस असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या नोटीशीला १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.