Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज उपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी - उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे

मिरज उपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी - उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे


सांगली दि. 14  : ‍मिरज उपविभागातील मिरज तालुक्यातील 13, तासगाव तालुक्यातील 17 व कवठेमहांकाळ तालुक्यातील 10 अशा एकूण 40 गावांतील रिक्त पोलीस पाटील पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता पद्मभूषण वसंतरावदादा पाटील पंचायत समिती मिरज येथे ठेवण्यात आला आहे. संबंधित गावातील नागरीकांनी आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी मिरज उपविभाग मिरज तथा पोलीस पाटील निवड समिती अध्यक्ष समीर शिंगटे यांनी केले आहे.

मिरज तालुक्यातील इनामधामणी, कवलापूर, कावजी खोतवाडी, कळंबी, कानडवाडी, आरग, पद्माळे, शिंदेवाडी, कदमवाडी, मानमोडी, नावरसवाडी, जुनीधामणी, ‍निलजी (एकूण 13 गावे), तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, चिंचणी, नागाव निमणी, वासुंबे,  बेंद्री, लिंब, शिरगाव कवठे, खुजगाव, जरंडी, मोराळे पेड, बलगवडे, वाघापूर, निंबळक, बिरणवाडी, भैरववाड, किंदरवाडी, नागेवाडी (एकूण 17 गावे) व कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, कुची, जाखापूर, कुंडलापुर, मोघमवाडी, कोकळे, विठुरायाचीवाडी, शेळकेवाडी, बसाप्पाचीवाडी, मोरगाव (एकुण 10 गावे), अशा एकूण 40 गावांतील रिक्त पोलीस पाटील पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 17 फेब्रुवारी रोजी होणार असल्याकचे उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.