माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल..
मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्र दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकली होती. पहाटेपासून ईडीचं हे धाडसत्र सुरु होते. कागलमधल्या घरी ईडीचे अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली होती. दरम्यान, यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली होती. त्यानंतर आता कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याआधीही माझी चौकशी झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे. मात्र, आता पुन्हा त्यांनी ही छापेमारी का केली हे मला काहीही माहिती नाही. 30 ते 35 वर्षांचे माझे सार्वजनिक जीवन लोकांच्या समोर आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी कारवाई केल्यानंतर काहीही सापडलेले नाही. केवळ त्रास देण्यासाठी हे सगळे सुरु असल्याचा पटलवार मुश्रीफ यांनी छापेमारीनंतर केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.