कॉंग्रेस पदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत “आशिष कोरी “ यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश
पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी मध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी आशिष कोरी यांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका प्रदेशाध्यक्ष नानभाऊ पटोले यांना भेट म्हणून दिली. सांगली जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेस नेत्यांशी याविषयी सविस्तर चर्चेनंतर झालेल्या हा प्रवेश झाला आहे. यावेळी आमदार संग्रामदादा थोपटे , आमदार संजय जगताप पुणे शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार , सातारा जिल्हा सरचिटणीस विराज शिंदे आदींची प्रमुख उपस्थिति होते.
देशातील घटनात्मक व्यवस्था धोक्यात आलेली असून घटनात्मक व्यवस्थेच्या संरक्षणासाठी कॉंग्रेसची आवश्यकता आहे . सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकवण्यासाठी कॉंग्रेसची आवश्यकता आहे . स्वातंत्र्य , समता आणि बंधुता या मुल्यांसाठी कॉंग्रेस च्या माध्यमातून काम करण्यासाठी संघी आहे. कॉंग्रेस हा सर्वांना सोबत घेवून जाणारा सर्वसमावेश पक्ष आहे . अशी भावना आशिष कोरी यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
काही दिवसांपुर्वी आशिष कोरी यांनी अमित ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनसेच्या पदांचा आणि सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता . म न से ची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मागे फरफट सुरू आहे सबब तीव्र स्वरूपाच्या वैचारीक आणि तात्विक मतभेदांमुळे म न से मधून बाहेर पडत असल्याचे आशिष कोरी यांनी स्पष्ट केलेले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.