Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांच्यासाठी दिल्ली पार्लमेंटवर प्रचंड मोर्चा!

आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांच्यासाठी दिल्ली पार्लमेंटवर प्रचंड मोर्चा!


28 मार्च 2023 रोजी आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांच्यासाठी दिल्ली पार्लमेंटवर प्रचंड मोर्चा! आटपाडी येथे झालेल्या आशा गटप्रवर्तक महिलांच्या 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातून हजारो आशा गटप्रवर्तक महिला दिल्ली मोर्चास जाण्याचा निर्णय

सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आटपाडी तालुक्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांचा मेळावा आटपाडी पंचायत समिती येथे झाला. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की देशांतील नऊ लाख आशा व गटप्रवर्तक महिला मागील सतरा वर्षापासून दररोज नियमितपणें अत्यंत कमी मानधनावर काम करीत आहेत. शासनाकडे अनेक वेळा या महिलांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या तोपर्यंत दरमहा किमान 25 हजार रुपये किमान वेतन द्या अशी मागणी करूनही याबाबत हे सरकार कसलाही निर्णय घेण्यास सरकार नाही.  अशी स्थिती सर्व देशभर आहे. म्हणूनच आयटक कामगार संघटनेच्या वतीने देशव्यापी तारीख 28 मार्च रोजी दिल्ली संसदेवर लाखो आशा व गटप्रवर्तक महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करावी असे आवाहन कॉ शंकर पुजारी यांनी केले. मेळाव्यामध्ये आशा महिलांच्या आंदोलनास आटपाडीतील सामाजिक कार्यकर्त्या सोनाली चव्हाण यांनीही पाठिंबा दिला.

महाराष्ट्रामध्ये 20 फेब्रुवारीपासून अंगणवाडी महिला संपावर जाणार असून या संपास आयटक आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वतीने जोरदार पाठिंबा देण्यात आला. तसेच या संपास सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी सहकार्य करावे असेही ठरविण्यात आले.  आटपाडी तालुका आशा व गटप्रवर्तक महिलांची तालुका कमिटी स्थापन करण्यात आली. यामध्ये आटपाडी तालुका अध्यक्ष रुपाली यमगर, जनरल सेक्रेटरी राधिका राजमाने,  स्वाती सबने खजिनदार, सुमया मुर्सल उपाध्यक्षा, अर्चना शिंदे सहसचिव, अनिता बनसोडे उपाद्यक्षा, प्रियंका कोळेकर उपाध्यक्षा व सुजाता ढोले उपाध्यक्षा अशी सर्वानुमते निवड करण्यात आली.

मेलाव्या मध्ये असेही आवाहन करण्यात आलेले आहे की, सांगली जिल्ह्यातील ज्या ज्या आशा व गटप्रवर्तक महिलांना शक्य असल्यास आपल्या कुटुंबीयांसह दिल्ली मोर्चा येण्यासाठी आयटक संघटनेकडे नाव नोंदणी करावी असेही आव्हान करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.