विनोद कांबळी पुन्हा अडचणीत,'दारूच्या नशेत...
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विनोद कांबळी यांनी पत्नी अँड्रिया हेविटनवर दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. विनोद कांबळी यांच्या पत्नीने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विनोद कांबळी याने मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाक घरातील पॅनचे हँडल तिच्यावर फेकले, त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा आरोप पत्नीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडली जेव्हा कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या वांद्रे फ्लॅटवर पोहोचले आणि त्याने त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली.
यानंतर ते किचनमध्ये धावत गेले आणि स्वयंपाक घरातील तव्याचे हँडल घेऊन पत्नीवर फेकले. वांद्रे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस येण्यापूर्वी विनोद कांबळी यांच्या पत्नीने भाभा रुग्णालयात उपचार घेतले होते, ५१ वर्षीय विनोद कांबळी यांचा वादांशी जुना संबंध आहे. काही काळापूर्वी त्यांनी एका मुलाखतीत नोकरीबद्दल बोलले होते. कांबळीने सांगितले होते की, माझ्याकडे कोणतेही काम नाही आणि ते फक्त बीसीसीआयच्या पेन्शनवर जगत आहेत. काही काळापूर्वी ते दारू पिऊन गाडी चालवल्यामुळेही चर्चेत आले होते.
काय आहे एफआयआर ?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घटनेनंतर विनोद कांबळीचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे. पत्नीने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये लिहिले की, "तो तिला घाबरवतो. तिला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ करतो, अगदी मारतो. आम्हाला स्वयंपाक घरातील तव्याने मारहाण केली आहे.’
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.