शॉपिंगसाठी एकावेळी हजारो रुपये खर्च करते प्राजक्ता माळी
अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. आता ती एक व्यावसायिकाही आहे. प्राजक्ता तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगताना दिसतात.
प्राजक्ता कशी राहते?, तिचं लाइफस्टाइल कसं आहे? याबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यास तिच्या चाहत्यांना आवडतात. आता प्राजक्ताने अशाच एका गोष्टीचा खुलासा केला आहे. शॉपिंग म्हणजे मुलींचा सगळ्यात आवडता विषय. प्राजक्ताचही अगदी तसंच आहे. पण ती शॉपिंगसाठी किती पैसे खर्च करते हे तिने सांगितलं आहे.
प्राजक्तालाही इतर सामान्य मुलींप्रमाणेच शॉपिंग करायला आवडतं. याचबाबत तिने आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. शेवटची शॉपिंग तू कधी केली होती? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. यावेळी शॉपिंगसाठी किती खर्च करते? किती महिन्यांमधून शॉपिंग करते याबाबत प्राजक्ताने सांगितलं.
प्राजक्ता म्हणाली, “खूप दिवसांमध्ये मी शॉपिंगच केलेलं नाही. सहा ते सात महिन्यांनी मी एकदा शॉपिंग करते. पण शॉपिंगला गेल्यावर मी सगळं गोळा करुन आणते. त्यावेळी जवळपास मी ४० ते ५० हजार रुपये खर्च करते.” म्हणजेच प्राजक्ता ५० हजारापर्यंत एकाच वेळी शॉपिंग करते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.