भाजप खासदाराचा मोठा गौप्यस्फोट
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्या, यासाठी हेलपाटे मारत आहेत. असे असताना फडणवीस यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी काल परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. यामुळे खरच रामराजे पक्ष सोडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच सभेतून घड्याळाचे चिन्ह, शरद पवारांचा फोटो गायब झाला होता. फलटणमध्ये असं अनेकवेळा होतं. त्यांना असं वाटलं की मला भाजपमध्ये अथवा शिवसेनेत घेतील, त्यावेळी ते चिन्ह गायब करतात,असेही ते म्हणाले.
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. नीरा देवघर प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पंढरपूर लोहमार्गासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा देत निधीची तरतूद केली. ग्रामीण रुग्णालयाचा आराखडा तयार करायला लावला. तसेच मतदार संघात नितीन गडकरी यांनी हजारो कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी जाहीर केले. यामुळे सध्या विकास दिसत आहे. हे बघून राजराजे यांच्यावर थोडा परिणाम झाला आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.