Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मार्चपासून 'या' राज्यातील रेस्टॉरेण्टमध्ये मिळणार नाही मद्य

मार्चपासून 'या' राज्यातील रेस्टॉरेण्टमध्ये मिळणार नाही मद्य


पुढच्या मार्च महिन्यापासून दिल्लीच्या रेस्टॉरेण्ट आणि बारमध्ये मद्य मिळणार नाहीय. जुन्या अबकारी धोरणात बदल केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी नव्या परवान्यांसाठी मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे बार आणि रेस्टॉरंट मालकांसमोर संकट निर्माण झाल्याने याबाबत ते संपही पुकारु शकतात.

दिल्ली सरकारच्या जुन्या अबकारी धोरणामध्ये बदल करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कोणत्याही नव्या परवान्यांसाठी मंजुरी दिलेली नाही. दुसरीकडे, 28 फेब्रुवारीपर्यंत परवान्याचे नूतनीकरण करावे लागेल, असे बार आणि रेस्टॉरंट मालकांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यावेळी दिल्ली सरकारने मार्च महिन्यात 2 ड्राय राज्ये घोषित केली आहेत. यामध्ये पहिला ड्राय डे होळी 8 मार्चला असेल, तर दुसरी रामनवमी 30 मार्चला असेल.

नॅशनल रेस्टॉरेण्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षांनी याबाबत सांगितले की, दिल्लीचे सर्व उत्पादन शुल्क परवानाधारक ESCIMS पोर्टलवरुन ट्रान्जेक्शन करतात. विना वाहतूक परवाना कोणतही सामान होलसेल वेअरहाऊसपासून रेस्टॉरेण्टपर्यंत घेऊन जाऊ शकतात. याचा अर्थ कोणीही रेस्टॉरेण्ट ESCIMS या पोर्टलवर नवे काही खरेदी करु शकत नाही. तर NRAI चे अध्यक्ष कबीर सुरी यांनी सांगितले की, उत्पादन शुल्क विभागाने याला तात्परते 25 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यापर्यंत वाहतूक परवाना देणे अचानक बंद केले आहे. बार आणि रेस्टॉरेण्टचे उत्पादन शुल्क परवाना नुतनीकरण या महिन्याच्या अखेरपर्यंत करणे गरजेचे आहे.

सुरी यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, वाहतूक परमिटची अंतिम मुदत आणि तारीख वाढवण्याबाबत अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाही. याचा अर्थ कोणताही आउटलेट मद्याची नवीन बॅच खरेदी करू शकत नाही. यानंतर मद्याविना बार आणि रेस्टॉरेण्ट चालवावे लागतील. बार आणि रेस्टॉरेण्ट मालकांनी निदर्शनास आणले की, ईटींग हाऊस परवाने जारी न केल्यामुळे वाहतूक परवाने आणि अबकारी परवाने नूतनीकरणास विलंब होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.