Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील तीन दुचाकी चोरट्यांना अटक..

सांगलीतील तीन दुचाकी चोरट्यांना अटक..


जयसिंगपूर: जयसिंगपूर येथे दुचाकी चोरी करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साडेसहा लाख रूपये किमतीच्या चोरीच्या २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कनार्टक राज्यातील सुमारे ४० हून अधिक गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आणण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे. 

मल्लिकाजुर्न कल्लाप्पा म्हेत्री (वय ३१, रा. हनुमाननगर, सांगली), अंबादास श्रीमंत बबलाद (वय ३०, रा. हळ्ळी, ता. जत, जि. सांगली), आसिफ अकबर मुजावर (वय २४, रा. बिसूर, ता. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जयसिंगपूरचे  सहायक निरीक्षक रणजित पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.  

जयसिंगपूर येथील स्टेशन रस्त्यावरील गांधी चौक परिसरात एकजण संशयास्पदरित्या विना क्रमांकाची दुचाकी घेऊन थांबला होता. पथकाला त्याचा संशय आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कनार्टक राज्यातून तब्बल ४० हून अधिक दुचाकी चोरून त्या विकल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीच्या दुचाकी खरेदी केल्याप्रकरणी बबलाद आणि मुजावर यांनाही अटक करण्यात आली. 

त्यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाणे येथील तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज ग्रामीण, मिरजेतील महात्मा गांधी चौक, विश्रामबाग, आष्टा पोलिस ठाणे तसेच कनार्टकातील अथणी, आदशर्नगर, विजयपुरा येथील गुन्हे उघडकीस आले आहेत.  सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मागर्दशर्नाखाली अमोल अवघडे, रोहित डावाळे, निलेश मांजरे, स्मिता कांबळे, अंजना बन्ने, अभिजित भातमारे, संदेश शेटे, वैभव सूयर्वंशी, मंगेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.