पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पतीची पायपीट..
नवरंगपूर : रुग्णालयातून घरी रवाना होत असताना पत्नीचे रिक्षामध्येच निधन झाले. त्यामुळे रिक्षाचालकाने तिचा मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे पती तिचा मृतदेह खांद्यावर घेऊन ओडिशातील घराच्या दिशेने चालत निघाला. काही किलोमीटरची पायपीट केल्यानंतर वाटेत पोलिसांनी त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
पतीचे नाव सामुलू पांगी आहे. आजारी पत्नीला त्याने आंध्र प्रदेशच्या सांगीवलासा येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथे ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे पती तिला घेऊन रिक्षाने निघाला, मात्र तिचे वाटेतच निधन झाले. रिक्षाचालकाच्या हे लक्षात येताच त्याने मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे पतीने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत निघाला.
२०१६ सालीही घडला होता असाच प्रकार
२०१६ साली ओडिशामधील दाना मांझी याने आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन सुमारे १२ किमीची पायपीट केली होती. पत्नीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने त्याच्यावर ही स्थिती ओढविली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.