Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्टेट बँक ऑफ इंडियाला अ‍ॅटो लोन कॉन्सिलरनेच घातला ४७ कोटींचा गंडा

स्टेट बँक ऑफ इंडियाला अ‍ॅटो लोन कॉन्सिलरनेच घातला ४७ कोटींचा गंडा


वाहन व गृह कर्जावर बँका आकर्षक सवलती देऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढून घेत असतात. त्यासाठी बँका काही लोन कॉन्सिलरही  नेमते. अशाच एका लोन कॉन्सिलरने बनावट अ‍ॅटोलोन प्रकरणे करुन स्टेट बँक ऑफ इंडियाला  तब्बल ४६ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांना गंडा घातला आहे. 

याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकारी ममता कुमारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. ४५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदित्य नंदकुमार सेठीया (रा. प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी) व इतरांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया युनिर्व्हसिटी रोड शाखा व टिळक रोड शाखेत २०१७ ते २०१९ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेच्या युनिर्व्हसिटी व टिळक रोड शाखेमधून २०१७ ते २०१९ दरम्यान ४६ वाहन कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. बँकेच्या अंतर्गत ऑडीटमध्ये ही प्रकरणे संशयित असल्याचे निष्पन्न झाले. बँकेने अ‍ॅटो लोन कॉन्सिलर म्हणून अदित्य सेठीया याची नेमणूक केली होती. त्याने कर्जदार व इतरांशी संगनमत करुन वाहन कर्ज घेण्यासाठी कट रचला. 

खोटे व बनावट कोटेशन, टॅक्स इन्व्हाईस, मार्जिन व काही फुल पेमेंटच्या रिसीट तयार केल्या. त्या खरे असल्याचे भासवून बँकेतून मोठ्या प्रमाणावर वाहन कर्ज मंजूर करुन घेतले. त्यातील काही प्रकरणांमध्ये ते सुरुवातीला काही इतर खात्यावर वर्ग करुन नंतर संबंधित वाहन कर्जदार याचे नावावर वर्ग केले. त्यामुळे बँकेची मूळ वाहन कर्ज मंजूर केलेल्या ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांची फसवणुक केली. याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर अधिक तपास करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.