Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींचे दिवस संपले आता राहुल गांधी यांना अच्छे दिन येणार..

मोदींचे दिवस संपले आता राहुल गांधी यांना अच्छे दिन येणार..


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे सध्या काँग्रेसला चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे. तशी आकडेवारी देखील समोर आली आहे. सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.

भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता सर्वेतून पुढे आली आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार यूपीएच्या मतांमध्ये आणि जागांमध्ये वाढ झाली आहे. भारत जोडो यात्रेकडे काँग्रेसची चांगली रणनीती म्हणून पाहिले जात आहे, असे या सर्वेतून दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात समोर आलेल्या या सर्वेक्षणात 153 जागा यूपीएच्या खात्यात जाताना दिसत आहेत. जानेवारी 2022 मध्येही या सर्वेक्षणात यूपीएला 127 जागा मिळाल्या होत्या. यामुळे हा आकडा खूपच कमी होता.

असे असताना याची तुलना केली तर हे स्पष्ट होते की आता निवडणुका घेतल्या तर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या लोकसभेच्या जागांमध्ये 62 जागांची वाढ होणार आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेससाठी राजकीय वातावरण तयार झाले आहे. देशभरातील लोकांना जोडण्यासाठी भारत जोडो यात्रेकडे काँग्रेसची चांगली रणनीती म्हणून पाहिले जात आहे, असे या सर्वेतून दिसून आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.