Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली एलसीबीची कारवाई कवठेपिरानजवळ वीस लाखांचा गांजा जप्त..

सांगली एलसीबीची कारवाई कवठेपिरानजवळ वीस लाखांचा गांजा जप्त..


सांगली : कवठेपिरान सवोर्दय कारखाना रस्त्यावर गांजाची विक्री आणि तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १०२ किलो गांजा, दोन कार असा २९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

आदिल नासीर शहापुरे (वय ३३, रा. बाबर गल्ली, सांगली), सचिन बाळासाहेब चव्हाण (वय ३१, रा. कवठेपिरान), मयुर सुभाष कोळी (वय ३३, रा. डी माटर् मागे, सांगली), मतीन रफीक पठाण (वय ३१, रा. राधाकृष्ण वसाहत, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी अंमली पदाथार्ची तस्करी आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक पथक तयार केले होते.   

बुधवारी निरीक्षक शिंदे कवठेपिरान सवोर्दय कारखाना रस्त्यावरील चव्हाण यांच्या शेतात काहीजण गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये गांजाने भरलेली पोती आढळून आली. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. 

त्यानंतर त्यांच्याकडील १०२ किलो गांजा, मारूती कार (एमएच 10 बीएम ७८३३), रिओ कार (एमएच 10 बीएम ४५३४) असा २९ लाख लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.   पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, मच्छींद्र बडेर्, सचिन कनप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.