Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सी.आर. सांगलीकर अनाथपिंडक पुरस्काराने सन्मानित..

सी.आर. सांगलीकर अनाथपिंडक पुरस्काराने सन्मानित..


जत: रसिकलाल एम धारीवाल संकुल, आळंदी (पुणे) येथे बुद्ध विहार समन्वय समितीने आयोजित केलेले बुद्ध विहारांचे २ रे राष्ट्रीय अधिवेशन सुंदर नियोजनाने पार पडले. या अधिवेशनात उद्योजक सी.आर. सांगलीकर यांना त्यांनी तन, मन, धनाने करत असलेल्या प्रामाणिक धम्म कार्याचा गौरव म्हणून बुद्ध विहार समन्वय समितीने अनाथपिंडक हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.

सांगली जिल्ह्यातील सांगलीकर यांनी त्यांच्या जन्मगावी गुगवाड येथे स्वतःच्या तब्बल वीस एकर जमीनीमध्ये पंधरा कोटींचे देखणं प्रशस्त, स्वखचनि धम्मभूमी बुद्ध विहार उभारले आहे. गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर २०२२ ला धम्मभूमी चा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अंदाजे दोन लाख धम्मबांधवांच्या उपस्थितीत अतिशय दिमाखात पार पडला आहे.



सांगलीकर यांनी निस्वार्थी पणे धम्म कार्य करत असल्याने कार्यक्रमास विविध भागांतून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या बरोबर धम्म कार्याबद्दल चर्चा केली. बुद्ध विहारांच्या दुसऱ्या' अधिवेशनाचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती, मुख्य आयोजक गजानन पडघम तर स्वागताध्यक्ष आचार्य अशोक प्रियदर्शनी होते. तसेच यावेळी गोव्यातील पहिल्या बुद्ध विहारचे डॉ. उल्हास चांदलकर, नाशिकचे प्रविण गांगुर्डे यांच्यासह विविध ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बुद्ध समन्वय समितीमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समन संघ, बौद्ध विकास महासंघ, बुध्दीस्ट फ्रटरनिटी मुव्हमेंट राजस्थान, बौद्ध महा संघ गुजरात, बुद्ध विहार संकलन समिती, समता सैनिक दल, तिबेटीयन बौध्द समाज, नशनल को- आर्डीनेशन कमिटी आफ बुद्धीस्ट आर्गनायजेशन (इंडिया) या भारतातील संस्थांचा समावेश आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम केले आहे. त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.