Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार सुशीलकुमार शिंदे , विद्याधर अनास्कर यांना जाहीर प्रा. शरद पाटील, रामभाऊ घोडके यांना ऋणानुबंध पुरस्कार पृथ्वीराज पाटील यांची घोषणा

सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार सुशीलकुमार शिंदे , विद्याधर अनास्कर यांना जाहीर प्रा. शरद पाटील, रामभाऊ घोडके यांना ऋणानुबंध पुरस्कार पृथ्वीराज पाटील यांची घोषणा



सांगली : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने यंदा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ञ श्री. विद्याधर अनास्कर यांना देण्यात येणार आहे. याशिवाय सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार  शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि कबड्डी या खेळासाठी आयुष्य वेचलेले श्री. रामभाऊ घोडके यांना देण्यात येणार आहे , अशी घोषणा ट्रस्टचे  चेअरमन श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे केली.

श्री. पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी सुरुवातीला न्यायालयात पट्टेवाला म्हणून काम केले आहे त्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात हवालदार पदावर ते काम करू लागले. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या श्री. शिंदे यांनी अत्यंत हालाकीतून मोठी वाटचाल आहे. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. केंद्रात ऊर्जा खात्याचे मंत्रीपदही त्यांनी सांभाळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तसेच आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी नऊ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. काँग्रेस काँग्रेस पक्षातील या ज्येष्ठ नेत्याचे सामाजिक क्षेत्रातले योगदान खूप मोठे आहे. त्यांचे वक्तृत्व अत्यंत खुमासदार आणि अभ्यासू आहे.

श्री. विद्याधर अनास्कर हे बँकिंग क्षेत्रातले खूप मोठे नाव आहे . महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर प्रशासक (अध्यक्ष) म्हणून ते सध्या काम करत आहेत. महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. याशिवाय इतरही अनेक संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत. बँकिंग साक्षरतेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विविध अभ्यास समित्यांवर ते कार्यरत आहेत. सहकारी कायदा दुरुस्त्यावरच्या कमिट्यांवरही ते काम करतात. त्यांची बँकिंग विषयावर अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. लिज्जत पापड या सहकारी उद्योगातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. गेली २८ वर्षे ते सहकार चळवळीत कार्यरत आहेत. 

प्रा. शरद पाटील यांनी आमदार म्हणून सोळा वर्षे काम केले आहे. ते कुपवाड, मिरज आणि सातारा येथे वृद्धाश्रम चालवतात, यशवंत शिक्षण संस्थेद्वारे सात हायस्कूल्स आणि एक मिरज महाविद्यालय ते चालवतात. विविध चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचे प्रश्न मांडले आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातले त्यांचे योगदान लक्षवेधी असेच आहे. विधीमंडळही त्यांनी गाजवले आहे. रामभाऊ घोडके हे कबड्डी क्षेत्रामध्ये १९६१ पासून कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्तरापर्यंत ते कबड्डी खेळले आहेत. कबड्डी क्षेत्रात त्यांचा खेळाडू म्हणून खूप मोठा दबदबा होता. आझाद व्यायाम मंडळाची स्थापना त्यांनी केली आणि त्याद्वारे कबड्डी आणि अन्य खेळांचा विकास केला. अनेक खेळाडू त्यांनी घडवले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक स्पर्धा तसेच निवड चाचणी स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या भरवल्या आहेत. गेल्या वर्षापासून त्यांनी जेष्ठांच्या कबड्डी स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुराही ते यशस्वीरित्या सांभाळत आहेत.


श्री. पाटील म्हणाले, सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचे ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवारसाहेब यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आ. एच.  के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार वितरण होणार आहे. येथील तरुण भारत स्टेडियमवर सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने यापूर्वी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक दिनकर द. पाटील, सहकारमहर्षी शंकरराव काळे, मा. शिवाजीराव भोसले, मा. सा. रे. पाटील, मा. विजयसिंह मोहिते-पाटील, मा. शिवाजीराव सावंत, मा. कल्लाप्पा आण्णा आवाडे, मा. डी. के. काका पाटील, मा. प्र. शं. ठाकुर, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील, क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर, भारती विद्यापीठाचे संस्थापक व माजीमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारातील अभ्यासक जयराम देसाई, डॉ. शा. ब. मुजूमदार, साहित्यीक शिवाजीराव सावंत, डॉ. एस. व्ही. सोरटुर यांना गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.